Posts

Showing posts from October, 2019

🔸म्हारो घागरो🔸

Image
 वस्त्रविश्व   म्हारो घागरो.....  नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच कपड्यांच्या दुकानामध्ये [आणि ऑनलाईनसुद्धा] घागऱ्यांची  जाहिरात सुरु होते. रंगीबेरंगी घागऱ्यांनी बाजारपेठा सजतात. पारंपरिक ‘ चनिया चोली’, ‘घागरा ओढणी’, ‘केडीयू’ लक्ष वेधून घेतात. खरंतर घागरा हा गुजरात, राजस्थानमधील; पण महाराष्ट्राने तो आपलासा केला. ‘गरबा’ नवशक्तीच्या आराधनेचे एक माध्यम आहे. या माध्यमाद्वारे देवीसमोर नृत्य करून, प्रार्थना करून तिच्याकडून शक्ती, सामर्थ्य प्राप्त होवो यासाठी गरबा नृत्य केलं जातं.  गरबा, दांडिया हा मुळचा गुजरातचा उत्सव असला तरी त्या आकर्षक, ठेकेदार नृत्यामुळे आणि मुख्यतः ते नृत्य करताना परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांमुळे तो साऱ्यांनाच प्रिय झाला आहे.  शहरात, ग्रामीण भागातही या नृत्यावर ठेका धरला जातो.  लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच संगीताच्या तालावर, त्या ठेक्यांवर गरब्याचा फेर धरत असतात. या नृत्याचं खास वैशिष्टय म्हणजे पारंपरिक वेशभूषा आणि पोशाख. तरुणांसाठी असतो खास ‘ केडीयू ’. या पोषाखामध्ये टू पीस, थ्री पीस आणि फोर पीस देखील असतात. केडीयू म्हणजे कुर्...