Posts

Showing posts from September, 2019

उर्ध्ववस्त्रे....उत्तरीय ते शेला🔶 

Image
 वस्त्रविश्व उर्ध्ववस्त्रे....उत्तरीय ते शेला   माणसाला उर्ध्ववस्त्रे परिधान करण्याची इच्छा का बरं झाली असेल? हो. नक्कीच आपण सांगू शकतो, शरीर संरक्षणासाठीच!! प्राचीन काळापासून माणसाने उर्ध्ववस्त्रांचा अतिशय सुरेख असा वापर केला आहे. उत्तरीय, उपरणं, छाटी, शेला, शाल ही सारी उर्ध्ववस्त्रे. पूर्वीची उर्ध्ववस्त्रे ही रेशमी होती. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पुरुषांपेक्षा बायकांनाच नटण्यामुरडण्याची अधिक हौस असते. पण हे काही खरे नाही हं! ही सारी उर्ध्ववस्त्रे शरीर संरक्षणासाठी तर वापरली जात असतच शिवाय ती स्वतःच्या अंगावर पांघरताना त्यामागे सौंदर्यदृष्टीही असे. यातूनच प्राचीन काळी पुरुषांनाही सुंदर दिसावं, रुबाबदार दिसावं असं नक्कीच वाटत असेल ना! कारण पवनार येथील राजा दशरथ विषाद आणि राम भरत भेट या शिल्पपट्टावर दशरथ आणि रामाच्या अंगावर जे उत्तरीय आहे ते अत्यंत कलात्मकरित्या परिधान केल्याचे दिसून येते. ते डाव्या खांद्यावरून डावी बाजू झाकून उजव्या हाताच्या खालून कमरेपर्यंत घेतले आहे.  अंगावर पांघरण्यात येणाऱ्या वस्त्रात उत्तरीयाचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. प्राचीन क...

🔶उष्णीष.. अर्थात् पटका, फेटा, पगडी, मुंडासं...

Image
 वस्त्रविश्व   उष्णीष.. अर्थात् पटका, फेटा, पगडी, मुंडासं...  अगदी लहानपणापासून फेटा, पटका असे उष्णीष अर्थात शिरोवेष्टन आपण पहात असतो. केवढं लांब-रुंद कापड असतं ते? एवढं मोठं कापड किती कलात्मक पद्धतीनं आणि छान पद्धतीनं बांधतात नं डोक्याला? हे लांब-रुंद शिरोवेष्टन साऱ्यांनाच कसं काय बुवा प्रिय? आणि विशेष म्हणजे त्यामागे शिरोरक्षणाबरोबर सौंदर्यदृष्टीही असते. शेतकरी-कामकऱ्यांच्या डोक्यावर आहेच. व्यापारी बांधव वापरतात. संत-महात्म्यांचे फोटो पहा, तिथेही त्यांच्या डोक्यावर दिसतंच. कीर्तनकार शिरोवेष्टन धारण केल्याशिवाय कीर्तनास उभेच रहात नाहीत. थोर, नेते मंडळींनीही त्याला आपलंसं केलं. शाहीर म्हटला की त्याच्या डोक्यावरचा तो फेटा आणि तो ऐटदार तुरा यांचा थाट काय विचारावा? नवरदेव, वरात, मिरवणूक यांचं तर या शिरोवेष्टानाशी अतूट नातं. एकूण काय, सगळ्याच क्षेत्रांतील मंडळींना हे शिरोवेष्टनाचे प्रकार प्रिय आहेत तर... संस्कृतमध्ये शिरोवेष्टनाला ‘उष्णीष’ असा शब्द आहे. उष्णीष म्हणजे, ऊन लागू नये म्हणून मस्तकाला बांधायचं वेष्टन. पागोटं, फेटा, पटका, मुंडासं, रुमाल, साफा, कोशा, मंदील आणि पगडी अशा...

🔶टापरी ते स्कार्फ🔶

Image
 वस्त्रविश्व   टापरी ते स्कार्फ  पुष्कळशा शब्दांचे अर्थ शब्दकोशात कळतात पण वळतात ते मात्र अनुभवल्यानंतरच! ‘ टापरी ’ हा असाच एक शब्द. या शब्दाचा अर्थ खेड्यातून प्रवास करत असताना गवसला. एका खेडेगावी बस थांबली. वयस्कर खेडूत बसमधून उतरले. ते उतरताच बस सुटली. तेवढ्यात त्या वयस्कर गृहस्थाने बसचा दरवाजा ठोठावला. म्हणाले, “अहो, माझी टापरी राहिली ती तेवढी द्या.” टापरी म्हणजे नेमकं काय हे कुणाच्याच लक्षात येईना. तेवढ्यात ते गृहस्थ पुन्हा म्हणाले, “अहो, मी बसलो होतो तिथे एक लांबरुंद फडकं आहे, तीच माझी टकुऱ्याला बांधायची टापरी.” दुसरे गृहस्थ बोलले, “काय राव, आम्हाला वाटलं टापरी म्हणजे असेल एखादी बुट्टी किंवा काही वस्तू.. हे तर साधं फडकं आहे. ” ‘टापरी’ या शब्दाचा अर्थबोध झाला तो तेव्हाच. रानावनात काम करताना ऊन, वारा, थंडी, धूळ यापासून संरक्षण व्हावे किंवा एखादी जड वस्तू डोक्यावरून न्यायची असेल तर कान, डोके, झाकण्यासाठी मोठ्या आकाराचे फडके डोक्याला बांधत असत. ग्रामीण भाषेत यालाच म्हणतात टापरी. काही ठिकाणी रुमाल किंवा पागोटे यावरून कान आणि हनुवटी झाकणारे कापड बांधतात. यालाही टापर किंवा टा...

🔶पीतांबर, मुकटा, कद आणि धाबळ

Image
 वस्त्रविश्व   पीतांबर, मुकटा, कद आणि धाबळ काही वस्त्रे अशी असतात की त्या वस्त्राकडे पाहताच एकाचवेळी त्या वस्त्राचं आकर्षणही वाटतं  आणि आदरही वाटतो. मनात पवित्र भाव निर्माण होतात. अशी वस्त्रे म्हणजे पीतांबर, मुकटा, कद . ही आहेत. ‘अहत’ वस्त्रे. ‘अहत’ म्हणजे आघात न  केलेलं. तसंच पीतांबर, कद, मुकटा या रेशमी वस्त्रांना कोशावस्त्रे असंही म्हणतात. त्याला कारणही तसंच आहे. पतंगाच्या [बॉम्बिक्स मोरी जातीचे पतंग यासाठी उच्च दर्जाचे समजले जातात.] कोशाच्या धाग्यांपासून ही वस्त्रे विणली जातात. पीतांबर या महावस्त्राचं नातं देववस्त्राशी जोडलं गेलं आहे. देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या अंगावर पीतांबरच आढळतं. पीत+अंबर = पीतांबर . म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र. मुळात रेशमी धाग्याचा नैसर्गिक रंग पीत रंगच्छटेकडे झुकणारा असतो असं म्हणतात. पिवळा रंग पूर्णत्वाचा, परिपूर्ततेचा संकेत देणारा असतो. असा हा पिवळा रंग या वस्त्राला दिला जातो, म्हणून रेशमी वस्त्राला ‘पीतांबर’ म्हटलं असावं. पीतांबर हे तलम घट्ट विणीचे जरतारी काठाचे रेशमी वस्त्र. पीतांबराच्या काठावर विणली जाण...