Posts

Showing posts from November, 2019

🔻नऊवारी लुगडी- स्त्री लेणी...🔻

Image
  🔶 वस्त्रविश्व🔶 🔻नऊवारी लुगडी- स्त्री लेणी...🔻  “ए.. वॉव, किती सुंदर दिसतीये तुझ्या अंगावर ही नऊवारी पैठणी!” “ए..ती बघ पेशवाई! कित्ती गोड दिसतेय ना..!” “ओहो..! आल्या बघा नऊवारीतल्या राजमाता शिवगामी देवी!” “आणि तुमचा काय बाई थाट विचारता.. ब्राम्हणी पद्धतीनं नेसली इरकली!” “मस्त..सुंदर..खासच..!” असे प्रफुल्लित उद्गार कानी येत होते. तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. कारण त्या दिवशी होता ट्रॅडिशनल डे! तऱ्हेतऱ्हेच्या, विविध प्रकारच्या, आकर्षक रंगांच्या नऊवारी साड्यांचं जणु दालनच उघडलं होतं. चंद्रकळा, पैठणी, जिजामाता, नारायणपेठी, बनारसी, शालू, माहेश्वरी, नागपुरी, नारायणपेठी, इरकली, धारवाडी, इचलकरंजीची छापील सुती अशा नाना तऱ्हेच्या नऊवारी नेसलेल्या त्या तरुणींकडे पाहताना खूप प्रसन्न वाटत होतं.    नऊवारी नेसणं तसं सोपं नाही. “नऊवारी नेसणं म्हणजे कासोटा घालणं किंवा काष्टा घेणं इतकंच ना.. त्यात काय विशेष!” असं काहीजणी खोचकपणे म्हणतात. पण खरंच नऊवारी नेसण्याचं तंत्र इतकं सोपं नाही. नऊवारी नेसण्याची पद्धत ज्याला प्रथम सुचली असेल त्याला खरंच मानलं पाहिजे. नऊवारी स...

🔻कान्होबा तुझी घोंगडी...🔻

Image
🔶 वस्त्रविश्व🔶 🔻कान्होबा तुझी घोंगडी...🔻 ‘काठी न घोंगडं घेउ द्या की रं! मला बी जत्रंला येऊ द्या की रं!’  अनेकजण हे प्रसिद्ध गीत गातात किंवा खांद्यावर घोंगडं घेऊन पारंपरिक धनगरी वेशात नृत्यही करतात. आजकाल घोंगडं दिसतं ते या गाण्यातच अधिक. खरंतर घोंगड्याला प्राचीन परंपरा आहे. माणसानं वस्त्र निर्मितीचा विचार जेव्हा केला तेव्हा मेंढ्यांच्या केसांपासूनही वस्त्रनिर्मिती होते, हे त्याच्या लक्षात आलं. त्यातून निर्माण झालं ते घोंगडं. पूर्वी घरोघरी घोंगडी असायची. घरात पाहुणे येणार म्हटलं की बसण्यासाठी प्रथम घोंगडंच घातलं जायचं. आठवते ते ती ‘पाहुणचार’ कविता. कवी ग.ल. ठोकळ म्हणतात, ‘या बसा पाव्हनं असं| रामराम घ्या| कोनच्या तुम्ही गावचं? गाठुडं तिठं राहुंद्या| घोंगडी टाकली इठं, बसा तीवर, अनमान करूं नका आतां, हे समजा अपुलं घर|’ पूर्वी पाहुणचाराची पद्धत होती ती अशी!    घोंगड्यांचा उपयोग सर्व ऋतूंत केला जायचा. बसण्यासाठी अंथरुण म्हणून थंडीच्या दिवसांत पांघरूण म्हणून तर पावसाळ्यात शेतात राबताना घोंगड्यांची खोळ करून (घोंगटा) डोक्यावरून घेतलं जाई. घोंगडयांवर पाणी ठरत नसल्याम...

🔻महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी🔻

🔶 वस्त्रविश्व🔶 🔻महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी🔻   कवयित्री शांताबाई शेळके यांनी ‘पैठणी’ या कवितेत स्त्रीच्या हळुवार मनाची भावावस्था हृदयस्पर्शी शब्दांत मांडली आहे. त्यातल्या काही ओळी, ‘धूर कापूर उदबत्त्यांतून, जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन..एक मन.. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली’ अशीही प्रतिमा रुपानं आलेली पैठणी मनात एक हळवं स्थान निर्माण करून जाते.   प्रत्येक स्त्रीला हवीहवीशी वाटणारी पैठणी. पैठणी बघताच मनात किती भावतरंग उमटतात ना! पैठणी प्रथम हळुवार हाताने उचलावी. त्या झुळझुळीत, अलवार महावस्त्रावरून अलगद हात फिरवावा. डोळे मिटून तिचा खोलवर गंध घ्यावा. त्या स्पर्शाच्या, गंधाच्या धुंदीत असतानाच डोळे भरून पहावं. भरजरी पदराचं, काठाचं मनोमन कौतुक करून त्यावरील मोराशी हितगुज करत करत या महावस्त्राची घडी मोडावी. अशीच भावना स्त्रियांच्या मनात उमटत असेल, हो ना? आहेच पैठणी तशी, महाराष्ट्राचं भूषण ठरलेली. भारतात अनेक प्रकारच्या साड्या विणल्या जातात. बऱ्याच साड्यांना गावावरून नाव मिळालं. जसं बनारसची बनारसी, इंदुरची इंदुरी तसं पैठणच...

🔶मीठी अगन🔶

 🔶मीठी अगन🔶 सकाळची नेहमीची घाई, धावपळ! काही कामासाठी बाहेर निघाले होते. गळ्यात ओढणी अडकवली. तेवढ्यात मानेवर डाव्या बाजूला काहीतरी गुळगुळल्यासारखं झालं. मी थोडंस्स दुर्लक्ष केलं. पण नंतर ओढणी सारखी करता करता लक्षात आलं की परत तिथंच खाजल्याची जाणीव होतेय आणि गुळगुळतंय. त्याक्षणी माझा हात मानेवर गेला. हाताला जे लागलं ते पकडून मी हात समोर आणला. हातात जे सापडलं ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. मी चाटच पडले. तो प्राणी बघितल्यावर मी स्तिमित झाले. थोडीशी भीती, किंचित कुतूहल आणि प्रचंड आनंद अशी माझी अवस्था झाली... माझ्या तळहातावर होतं ‘सुरवंट’! मी त्याच्याकडे अनिमिष नेत्राने बघतच राहिले. माझ्या मुलीनं मोठमोठ्यानं हाका मारल्यावर मी भानावर आले. आणि त्याला बाल्कनीत असलेल्या कुंडीत सोडून मी बाहेर पडले.  थोड्याच वेळात हाताच्या बोटांवर, मानेवर खाज सुटून आग होऊ लागली. मी जाम खूष झाले. ती आग.... ती खाज... जणु काही मला गुदगुल्या करत होती. ‘मीठी अगन’ म्हणतात तसं! त्याचा मला त्रासच वाटत नव्हता. मला इतकं बरं वाटत होतं की, त्या जागेवर मला खाजवावसं ही वाटेना. न जाणो ते ‘दुखरं सुख’ दूर जाईल की काय अ...